“अजित पवार भावी किंवा माजी नाही, ते सदैव…”, उपमुख्यमंत्री पदावरून संजय राऊतांचा टोला!
राज्यात सत्तास्थापनेला वेग आला असून मंत्रिपदांसाठी रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक असल्याचं म्हटलं जातंय. यावर संजय राऊतांनी टोला लगावत, "अजित पवार सदैव उपमुख्यमंत्री असतात. त्यांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य आहे. त्यांनी ईव्हीएमची पूजा केली पाहिजे," असं विधान केलं.