“…आणि एकेदिवशी कळेल पहलगामच्या सहा अतिरेक्यांनी भाजपात प्रवेश केलाय”, संजय राऊत
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा बळी गेला होता. यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली. त्यांनी म्हटले की, हल्लेखोर भाजपात सामील होतील, अशी प्रेस नोट भाजपाकडून काढली जाऊ शकते. म्हणून पकडले जात नसतील. तसेच, ऑपरेशन सिंदूरचा राजकीय वापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.