विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांबरोबर हाणामारी? संजय राऊतांनी शेअर केला VIDEO
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि स्थानिक गावकऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं दिसतंय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडिओ शेअर करून नार्वेकर यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हिडिओ अलिबागचा असल्याचं सांगितलं असून, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मोजणी केल्यामुळे गावकऱ्यांनी विरोध केल्याचं म्हटलं आहे. व्हिडिओची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही.