सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर!
गुजरातमधील 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' चे शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली. २५ लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राम सुतार यांनी अनेक महत्त्वपूर्ण शिल्पे घडवली आहेत, ज्यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश आहे.