बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री गोळीबार झाला, ज्यात त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे राज्यातील आणि मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.