शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीची ६० वर्षे; सुळेंची पोस्ट, म्हणाल्या, “सहा दशकांच्या…”
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीचे साठावे वर्ष सुरू झाले आहे. त्यांच्या या प्रवासात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे सहा वेळा, विधानपरिषदेचे एकदा, लोकसभेचे सात वेळा आणि राज्यसभेचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या या प्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि त्यांच्या जुन्या फोटोसह पोस्ट शेअर केली आहे.