उद्धव ठाकरेंनी दिले राज ठाकरेंशी युतीचे संकेत; म्हणाले, “मराठी माणूस.. “
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा ५९ वा वर्धापनदिन सोहळा मुंबईत पार पडला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाप्रणीत सरकारवर टीका केली आणि राज ठाकरेंच्या मनसेशी संभाव्य युतीबाबत भाष्य केले. त्यांनी मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून विरोधकांच्या प्रयत्नांवर टीका केली. "तुमच्या मनात जे आहे, तेच मी करेन," असे त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिले.