‘दिल्लीच्या चेंगराचेंगरीच्या घटनेत १२० प्रवाशी दगावले’, संजय राऊत धक्कादायक दावा
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर महाकुंभमेळ्यात जाण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीत १८ प्रवाशांचा मृत्यू झाला. शिवसेनेचे संजय राऊत यांनी भाजपावर महाकुंभचा प्रचारासाठी वापर केल्याचा आरोप केला. राऊत यांनी मृतांचा आकडा १२० ते १५० असल्याचा दावा केला. त्यांनी सरकारवर आकडे लपवण्याचा आरोप करत, कुंभमेळ्यात सात हजार लोक बेपत्ता झाल्याचे सांगितले.