संजय राऊतांना कर्करोगाचं निदान; म्हणाले, “ऐन दिवाळीत किमो घेतला, पाणीही पिता येत नव्हतं!”
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांना २०२५ च्या दिवाळीत कर्करोगाचे निदान झाले होते. त्यांनी एबीपी कट्टा कार्यक्रमात याबाबत खुलासा केला. कर्करोगाचे निदान झाल्यावर त्यांनी किमोथेरपी आणि रेडिएशन उपचार घेतले. उपचारांच्या त्रासामुळे दीड महिना बंदिस्त राहावे लागले. मात्र, त्यांनी या आजाराशी लढा देण्याचा प्रयत्न केला.