‘खासदार गेले, आता आमदार अन् नगरसेवकही फुटणार’; ठाकरे गटातील बंडावर शिंदे सेनेचा मोठा दावा
शिवसेनेत पुन्हा फूट पडण्याची चर्चा आहे. मातोश्रीवरच्या बैठकीला पाच खासदार गैरहजर राहिल्याने ही चर्चा वाढली. ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात जाणार असल्याचे बोलले जात आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांनीही आमदार आणि नगरसेवक ठाकरेंची साथ सोडतील असे म्हटले. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांनीही ठाकरे गटावर टीका केली.