कोकणातील गणेशभक्तांवरील प्रेमापोटी इतर भागातील एसटी प्रवाशी वेठीस
मुंबई: कोकणातील गणेशभक्तांवरील विशेष प्रेमापोटी राज्याच्या अन्य भागांतील एसटी प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. मुंबई, ठाणे, पालघर भागातील कोकणवासियांच्या सेवेसाठी पाच हजार पेक्षा जास्त एसटी बस मागविण्यात आलेल्या आहेत. राज्याच्या इतर भागातील एसटी प्रवाशांच्यात असंतोषाची लाट पसरली आहे.