सुनेत्रा अजित पवार! मंत्रालयात लागली पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी!
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मंत्रालयात अजित पवारांच्या दालनाबाहेर आता सुनेत्रा पवारांच्या नावाची पाटी लागली आहे. सुनेत्रा पवारांना राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास ही खाती आणि बीड व पुण्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. त्यांनी अजित पवारांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.