“सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली”, बिनविरोध निवडणुकीसाठी मोठ्या हालचाली
बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू असताना काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. सुनेत्रा पवारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला आहे. संजय राऊतांनी सांगितले की, उद्धव ठाकरे स्वतः बिनविरोध निवडणुकीबाबत बोलतील. काँग्रेस आणि महाविकास आघाडी एकत्र चर्चा करून निर्णय घेतील.