“आत्या मी…”, पुणे जमीन घोटाळाप्रकरणी पार्थ पवारांनी सुप्रिया सुळेंना काय सांगितलं होतं?
पुण्यातील १८०० कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवार यांना अभय देण्यात आले आहे, तर दोन सरकारी अधिकार्यांवर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांनी या अहवालावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही आणि तो वाचल्याशिवाय प्रतिक्रिया देणे योग्य नाही. पार्थ पवार यांच्यावर विश्वास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.