‘सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री दिसतील’, संजय शिरसाट यांचा दावा, नेमकं काय म्हणाले?
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दावा केला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री होतील. भविष्यात शरद पवार दुसऱ्या पक्षात जातील आणि पुढील महिन्याच्या १५ तारखेपर्यंत मोठी राजकीय उलाढाल होईल, असेही त्यांनी सूचित केले.