‘छत्रपती शिवरायांनी ईडीप्रमाणे सक्तीची वसुली केली’, स्वामी गोविंददेव गिरी यांचे विधान
छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती, तर स्वारी केली होती, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसने यावर आक्षेप घेतला. शिवरायांनी ईडीप्रमाणे सक्तीची वसुली केली, असे विधान स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी केले आहे. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.