“तुमच्यासाठी ते सेलिब्रिटी असतील, माझ्यासाठी..”, मुंढेंचा ‘त्या’ अभिनेत्यांना इशारा
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना 'विमल इलायची'च्या सरोगेट जाहिरातप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कायद्यानुसार कारवाई होईल असे स्पष्ट केले. महाराष्ट्रात गुटखा आणि पानमसाला विक्रीवर बंदी असून, 'विमल इलायची'च्या नावाखाली 'विमल पान मसाला'ची जाहिरात केल्याचा आरोप आहे. एका अभिनेत्याने अद्याप उत्तर दिलेले नाही, त्यामुळे त्याच्यावर खटला चालवण्याची प्रक्रिया सुरू आहे.