‘मी देव नाही’, तुकाराम मुंढे असं का म्हणाले?
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला (FDA) अतिउत्साही आणि हुकूमशाही वृत्तीने वागल्याबद्दल फटकारले होते. पुण्यातील सिप्ला फार्माच्या युनिटचा औषध विक्री परवाना रद्द करण्याचा आदेश एफडीएने मागे घेतला. न्यायालयाने एफडीएच्या कारवाईवर ताशेरे ओढले. अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आणि त्रुटी सुधारण्याचे आश्वासन दिले.