सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढेंची राज्यभरात धाड!
गणेशोत्सव आणि सणासुदीच्या काळात भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आक्रमक मोहीम उघडली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांत ४ कोटी ४५ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त करण्यात आला. पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि बुलढाणा येथे धाडी टाकून भेसळयुक्त बटर, पनीर, खवा आणि बर्फी जप्त करण्यात आली. नागरिकांनी भेसळीबाबत तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.