FDAचे आयुक्त असतानाही तुकाराम मुंढे यांच्याकडे MPSC चौकशीची अतिरिक्त जबाबदारी का?
एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार घडल्याच्या आरोपांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पेपरफुटीच्या घटनांमुळे पुण्यात ११ दिवस आंदोलन झाले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने तुकाराम मुंढे यांची पाच सदस्यीय समितीच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे. मुंढे यांना ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांच्याकडे एफडीएच्या आयुक्तपदाची जबाबदारी असताना समितीच्या नेतृत्वाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलीय.