शिंदे – ठाकरेंची शिवसेना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी एकत्र; राजकारणात नवा ट्विस्ट
राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता उद्भवली आहे. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आघाडी केली आहे. शिवसेनेचे (ठाकरे) आमदार दिलीप सोपल यांनी सोशल मीडियावर महाआघाडीची घोषणा केली.