“शेतात का जावं लागतंय”, ठाकरेंची बोचरी टीका, म्हणाले, “अमावस्येचा मुहूर्त…”
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी ईव्हीएम घोटाळ्यावरून पुण्यात आत्मक्लेष उपोषण पुकारलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. शिंदे साताऱ्यातील दरे गावी अस्वस्थ असल्याने गेले असून, नॉट रिचेबल आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या राक्षसी बहुमतावर प्रश्न उपस्थित केले. शेवटी, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं.