उद्धव ठाकरेंचं वक्तव्य; “युक्रेनचं युद्ध मोदींनी जसं एका फोनवर थांबवलं तसं बांगलादेशात…
देशाचं संसदेचं अधिवेशन सुरु असताना महाराष्ट्रातलं अधिवेशनही झालं. विरोधक चांगले प्रश्न मांडत आहेत असं सांगितलं जातं आहे. पण वस्तुस्थिती वेगळी आहे. उद्धव ठाकरे यांनी बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांवर मोदींना गप्प राहिल्याचा आरोप केला. त्यांनी पंतप्रधानांना हिंदूंवरील अत्याचारांबद्दल भूमिका घेण्याची विनंती केली. तसेच, भाजपाचं हिंदुत्व फक्त मतांसाठी असल्याचा सवालही केला.