वैष्णवी हगवणे प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, “मृतदेहावर जे वळ आढळले…”
राष्ट्रवादी पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणेने १६ मे रोजी आत्महत्या केली. तिच्या वडिलांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात आरोपींना अटक केल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.