‘डीजे समर्थक पंतप्रधान मोदी, योगींनाही विरोध करतील’, बापटांचे युक्तिवाद ऐकले का?
पुण्यातील विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सवातील लाऊडस्पीकर आणि ढोल-ताशांच्या विरोधात आवाज उठवला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना मारहाण झाली आणि राज्यभरात त्यांचे नाव चर्चेत आले. बापट यांनी पत्रकार परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला देत व्यक्ती माहात्म्य वाढवण्याचे घातक परिणाम सांगितले. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथांनाही विरोध होईल असे मत व्यक्त केले.