पुण्याच्या वकिलाचा पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर तलवारीने हल्ला
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमधील गुरुद्वारामध्ये निहंग शीख जसपाल सिंग यांनी कृपाणने हल्ला केला. यात बादल यांच्या हाताला आणि खांद्याला दुखापत झाली. हल्लेखोराला अटक करण्यात आली असून तो पुण्यातील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दोन वर्षांत गुरुद्वारामध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला होण्याची ही दुसरी वेळ आहे.