आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी फुटणार? काँग्रेस-शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर!
राज्यात विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. संजय राऊत यांनी मुंबईसह १४ महापालिकांमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी तयारी सुरू असल्याचे सांगितले. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संजय राऊतांवर टीका केली आणि त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्टता आल्यावर निर्णय घेऊ असे म्हटले.