महिला आरक्षण विधेयक २०२३ लाच मंजूर, मग आता कोणता कायदा? फडणवीसांचं उत्तर!
संसदेत राज्यघटना (१३१वी दुरुस्ती) विधेयक २०२६ मंजूर न झाल्याने देशभरात पडसाद उमटले आहेत. विरोधकांच्या एकजुटीमुळे हे विधेयक नामंजूर झाले, ज्यामुळे महिलांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केल्याचा आरोप केला. २०२३ मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाच्या अधिसूचनेबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले. विरोधकांनी संधी शोधून विधेयक थांबवण्याचा प्रयत्न केल्याचे फडणवीस म्हणाले.