‘अजितदादांच्या निधनामुळे बारामती पोरकी’, युगेंद्र पवार यांचे महत्त्वाचे विधान
बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांना उद्देशून एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या पत्रात शहरातील वाढती गुन्हेगारी आणि दहशतीच्या वातावरणाबद्दल चिंता व्यक्त केली. यावर युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया देत, पत्र लिहिणाऱ्याने पुढच्या वेळी नाव लिहावे असे आवाहन केले. त्यांनी अजित पवारांच्या अनुपस्थितीमुळे बारामती पोरकी झाल्याचे मान्य केले आणि सत्ताधाऱ्यांनी अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली.