४८ व्या वर्षी बोहल्यावर चढणार अभिनेता, १२ वर्षांनी लहान अभिनेत्रीशी वाढदिवशी करतोय लग्न
सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विशाल कृष्णा आणि अभिनेत्री सई धनशिका २९ ऑगस्ट २०२५ रोजी लग्न करणार आहेत. या दिवशी विशालचा वाढदिवसही आहे. दोघे १५ वर्षांपासून मित्र असून, बऱ्याच काळापासून डेट करत आहेत. सई ३५ वर्षांची असून, विशालपेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. सई धनशिका तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे, ज्यांनी 'कबाली'सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.