“माझा मुलगा सामान्य माणूस नाही”, ‘या’ अभिनेत्याची आई भडकली
'टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स' चित्रपटाला मिळत असलेल्या संमिश्र प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर, यशची आई पुष्पा अरुण कुमार यांनी निर्माते अल्लू अरविंद यांच्या जुन्या विधानाचा समाचार घेतला आहे. अल्लू अरविंद यांनी 'केजीएफ'पूर्वी यशच्या स्टारडमवर शंका उपस्थित केली होती. पुष्पा यांनी यशच्या संघर्षाबद्दल बोलताना त्याच्या यशस्वी करिअरची माहिती दिली. यशने कोणत्याही गॉडफादरशिवाय कन्नड सिनेसृष्टीत आपले स्थान निर्माण केले. पुष्पा यांनी काही लोक यशचे करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.