लग्नाआधीच गरोदर होती अभिनेत्री, स्वतः केला खुलासा; म्हणाली, “मला तो अनुभव…”
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉलने २०२३ मध्ये जगत देसाईशी लग्न केलं. लग्नानंतर ७ महिन्यांनी ती आई झाली. अमालाला गरोदरपणाने आयुष्यात दिशा मिळाली. तिच्या वडिलांच्या निधनानंतर आणि करोनामुळे ती भावनिक संघर्षात होती. तिला स्किझोफ्रेनियाची लक्षणं जाणवली. काही काळानंतर तिने बाली, थायलंड, श्रीलंका आणि लंडनमध्ये प्रवास करून स्वतःला सावरलं. अमालाचं पहिलं लग्न तमिळ दिग्दर्शक एएल विजयशी झालं होतं, पण २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.