मोहनलालबरोबर इंडस्ट्रीत पदार्पण, ‘या’मुळे संपलं करिअर; ‘ही’ अभिनेत्री सध्या काय करते?
२००९ मध्ये आलेला 'सागर इलियास जॅकी रिलोडेड' हा मोहनलाल अभिनीत चित्रपट अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरला नाही. या चित्रपटातून प्रयागा मार्टिनने पदार्पण केले. तिने 'पिसासू' या तमिळ चित्रपटात भूताची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवली. पुढे तिने अनेक चित्रपटांत काम केले, पण नंतरचे चित्रपट फारसे यशस्वी ठरले नाहीत. २०२४ मध्ये ड्रग्ज प्रकरणात तिचे नाव आले, पण तिला क्लीन चिट मिळाली. सध्या ती फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे आणि नवीन चित्रपट साईन केले आहेत.