“मोठा स्टार असूनही तो…”, उषा नाडकर्णींनी ‘या’ अभिनेत्याचं केलं भरभरून कौतुक; म्हणाल्या…
ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी लवकरच 'गांधी टॉक्स' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती प्रमुख भूमिकेत असून उषा नाडकर्णींनी त्याच्या आईची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विजयचा साधा आणि मनमिळावू स्वभाव उषा नाडकर्णींना भावला. त्यांनी विजयचं कौतुक करताना सांगितलं की, विजय इतका मोठा स्टार असूनही जमिनीवर राहतो आणि साधेपणाने वागतो.