‘अमेरिकाज गॉट टॅलेंट’ फेम कॉमेडियन कबीर सिंगचे निधन, ३९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रसिद्ध भारतीय वंशाचा कॉमेडियन कबीर 'कबीजी' सिंग याचे ३९ व्या वर्षी निधन झाले. 'अमेरिकाज गॉट टॅलेंट'च्या सेमी फायनलमध्ये पोहोचल्यामुळे तो चर्चेत आला होता. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्याचे निधन झाले असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही. पोलीस तपास करत आहेत. कबीरचे निधन झोपेत असताना झाले. त्याच्या होणाऱ्या पत्नीने ४ डिसेंबर रोजी निधन झाल्याची माहिती दिली. कबीर भारत व अमेरिकेत लोकप्रिय होता.