मंगळसूत्रावरुन ट्रोल करणाऱ्यांना अंकिता प्रभू वालावलकरचे उत्तर, म्हणाली, “नासक्या…”
इन्स्टाग्रामवर रील शेअर करत अंकिता म्हणाली, लग्न झाल्यापासून मी गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतेच. पण, तरीसुद्धा काही बायकांना ते दिसत नाही. त्यांच्या नासक्या कमेंट्स असतात की, 'हिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही दिसत, हिचं लग्न झालं आहे की नाही?' अशा कमेंट्स करतात."मला बंद गळ्याचे कपडे घालायला आवडतात. तरीही मी त्याचा गळा खाली करून, मी मंगळसूत्र घातले आहे हे दाखवू का? माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे, नवऱ्याला अगदी कसं जपून ठेवलंय, हे असं म्हणत फिरू का?"