“अल्लू अर्जुनबरोबर काम करायचंय.”, सूरज चव्हाणने व्यक्त केली इच्छा; म्हणाला…
‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त करतोय. 'झापुक झुपूक' चित्रपटानंतर सूरजने एका मुलाखतीत सांगितलं की, त्याला दाक्षिणात्य चित्रपटात काम करायचं आहे आणि अल्लू अर्जुनसोबत काम करण्याची त्याची इच्छा आहे. त्याने सांगितलं की, त्याचा लूक तिकडच्या लोकांसारखा आहे आणि सयाजी शिंदेंशी संपर्क झाल्यास तो नक्कीच दाक्षिणात्य इंडस्ट्रीत जाईल.