“मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो”, अभिजीत सावंतचं वक्तव्य; म्हणाला…
‘इंडियन आयडॉल’चा १६वा सीझन संपला असला तरी २००५ मध्ये पहिल्या सीझनचा विजेता अभिजीत सावंत आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. अभिजीतने अरिजित सिंहच्या कारकिर्दीबद्दल बोलताना त्याच्या मेहनतीचं कौतुक केलं. अरिजितने १० वर्षे प्रसिद्धीपासून दूर राहून संगीतकारांसोबत काम केलं आणि ‘तुम ही हो’ गाण्यामुळे लोकप्रिय झाला. अभिजीतने प्रेक्षकांना प्रत्येकाच्या प्रवासाचा आदर करण्याचं आवाहन केलं. यावेळी त्याने तो अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होता असंही म्हटलं.