अभिषेक बच्चनने ‘जलसा’च्या शेजारी घेतली मालमत्ता, दोन महिन्यांपूर्वी खरेदी केलेले फ्लॅट्स
अभिषेक बच्चनने नुकतेच जुहूतील समुद्रकिनाऱ्याजवळ एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. हे अपार्टमेंट अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्या शेजारी आहे. यापूर्वी अभिषेकने बोरिवलीत सहा फ्लॅट्स खरेदी केले होते. आता अभिनेत्याने नवी मालमत्ता खरेदी केली आहे. त्यामुळे सध्या अभिषेक चर्चेत आला आहे.