“म्हातारपणीचं प्रेम…”, पत्नी सुनीता आहुजांच्या अफेअरच्या आरोपांवर गोविंदाचं स्पष्ट उत्तर
गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांवर गोविंदाने स्पष्टीकरण दिले आहे. सुनीताने कोमल नाव घेतल्यावर गोविंदाने म्हटले की, त्याच्यावर अनेकदा आरोप झाले आहेत, पण कोमल त्याचे बालपणीचे प्रेम आहे. त्याने कधीच कोणत्याही अभिनेत्रीबरोबर गैरवर्तन केले नाही. सुनीताच्या वक्तव्याबद्दल माफी मागत, नवोदित अभिनेत्री घाबरू नयेत असेही तो म्हणाला.