Chetak Screen Awards nominations : ‘धुरंधर’, ‘सैयारा’ आणि ‘होमबाउंड’ला सर्वाधिक नामांकनं
चेतक स्क्रीन पुरस्कार सोहळा ५ एप्रिलला होणार आहे. नामांकनांमध्ये 'धुरंधर' सर्वाधिक आघाडीवर आहे. 'सैयारा', 'होमबाउंड', 'छावा', 'सुपर बॉयस ऑफ मालेगाव', 'हक' आणि 'धडक २' यांनाही विविध नामांकनं मिळाली आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, अभिनेता, सहाय्यक कलाकार, पार्श्वसंगीत, नृत्यदिग्दर्शन, छायाचित्रण, वेशभूषा, संवाद, दिग्दर्शन, एडिटिंग, लेखन, हेअरस्टायलिंग, गीत, साऊंड डिझाईन, विशेष प्रभाव, नवोदित कलाकार यांसाठी नामांकनं जाहीर झाली आहेत.