दीपिका-रणवीर लवकरच दुआसह नव्या घरात होणार शिफ्ट, १०० कोटींच्या आलिशान घराची पहिली झलक समोर
बॉलीवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह. दोघं नेहमी चर्चेत असतात. गेल्या वर्षी दोघं आई-बाबा झाले. लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिकाने ८ सप्टेंबर २०२४ला एका गोंडस मुलीला जन्म दिला. जिचं नाव दुआ असं आहे. अजूनपर्यंत दीपिका-रणवीरने दुआला सगळ्यांसमोर आणलं नाहीये. पण, बऱ्याचदा विमानतळावर दीपिका-रणवीर लेकीबरोबर दिसले आहेत. लवकरच दोघं लाडक्या लेकीबरोबर नव्या आलिशान घरात शिफ्ट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. नुकतीच दीपिका-रणवीरच्या नव्या घराची पहिली झलक पाहायला मिळाली.