दीपिका पादुकोणने आई झाल्यावर सोशल मीडियावर शेअर केली पहिली पोस्ट
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिला असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. बॉलीवूड सेलिब्रिटींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री आलिया भट्ट, क्रिती सेनॉन, शर्वरी वाघ, पूजा हेगडे, अर्जुन कपूर, सुनील ग्रोव्हर, श्रद्धा कपूर, हरभजन सिंग, गोहर खान, रश्मी देसाई अशा अनेक कलाकारांनी दीपिकाच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.