‘एक दो तीन…’, सुपरहिट गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स! अमेरिकेतील Video व्हायरल
१९८४ मध्ये 'अबोध' चित्रपटातून पदार्पण केलेल्या माधुरी दीक्षितने नुकतीच मनोरंजन क्षेत्रात ४० वर्षे पूर्ण केली आहेत. सध्या ती अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, त्याठिकाणी अभिनेत्रीच्या चाहत्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 'तेजाब'मधील 'एक दो तीन...' या गाण्यावर माधुरीने जबरदस्त डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.