Model Apologises To Kiara Advani After Video Viral With Sidharth Malhotra
1 / 31

सिद्धार्थ मल्होत्राबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मॉडलने कियाराची मागितली माफी

मनोरंजन Updated: August 10, 2024 19:58 IST

बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. दिल्लीत शांतनु आणि निखिलसाठी रॅम्प वॉक करतानाचा सिद्धार्थ व मॉडल एलिसिया कौरने हा व्हिडीओ आहे. यामध्ये मॉडल सिद्धार्थच्या खूप जवळ जाऊन पोज देताना दिसत आहे. यामुळेच एलिसियाने सिद्धार्थची पत्नी कियारा अडवाणीची माफी मागितली.

Swipe up for next shorts
Bigg Boss Marathi Season 5 Riteish Deshmukh praised Pandharinath Kamble
2 / 31

“तुम्ही हा आठवडा गाजवला…”, रितेश देशमुखने पंढरीनाथ कांबळेच्या खेळाचं केलं कौतुक, म्हणाला..

मनोरंजन Updated: September 14, 2024 21:16 IST

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सातव्या आठवड्याचा कॅप्टन्सी टास्क चांगलाच रंगला. छोट्या गोण्यांमध्ये कापूस भरून खेळलेल्या या कॅप्टन्सी टास्कमध्ये काही सदस्य चांगले खेळले. त्यापैकी एक म्हणजे पंढरीनाथ कांबळे. पंढरीनाथ यांनी अरबाज, वैभव सारख्या तगड्या सदस्यांना चांगलंच पळवलं. याचं कौतुक अभिनेता सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार अशा अनेक कलाकारांनी केलं. त्यानंतर आता ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुखने पंढरीनाथ कांबळेच्या खेळाचं भरभरून कौतुक केलं आहे.

Swipe up for next shorts
aarya jadhao first post after Elimination
3 / 31

“निक्कीला तिची लायकी दाखवून आली…”, आर्या जाधवच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

टेलीव्हिजन Updated: September 14, 2024 23:10 IST

'बिग बॉस मराठी 5'च्या पाचव्या पर्वात आर्या जाधवला निक्कीला मारल्यामुळे घरातून निष्कासित करण्यात आलं. कॅप्टन्सी टास्कदरम्यान झालेल्या झटापटीत आर्याने निक्कीला कानाखाली मारली होती. रितेश देशमुखने घटनाक्रम स्पष्ट केल्यानंतर बिग बॉसने आर्याला घरातून बाहेर काढलं. घराबाहेर पडल्यावर आर्याने इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट केली, ज्यात तिने लाल रंगाचा ब्रोकन हार्ट इमोजी वापरला आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

Swipe up for next shorts
Bigg Boss Eliminated Aarya for slapping Nikki
4 / 31

निक्कीला मारणं पडलं महागात, आर्याला बिग बॉसने दाखवला बाहेरचा रस्ता

टेलीव्हिजन Updated: September 14, 2024 22:01 IST

'बिग बॉस मराठी'च्या सातव्या आठवड्यात आर्या जाधव आणि निक्की तांबोळी यांच्यात कॅप्टन्सी टास्कदरम्यान वाद झाला. वादाच्या दरम्यान आर्याने निक्कीला कानशिलात लगावली. या घटनेनंतर बिग बॉसने आर्याला घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. रितेशने आर्याला निक्कीच्या वागण्यावरून तिला समज दिली आणि बिग बॉसने आर्याला घरातून निष्कासित केलं.

Monstrous bodybuilder dies of heart attack
5 / 31

बॉडीबिल्डर इलिया गोलेमप्रमाणे दिवसातून 7 वेळा जेवल्यास शरीरावर काय परिणाम होतील? वाचा

हेल्थ September 14, 2024 19:10 IST

Monstrous Bodybuilder Lllia Yefimchyk Dies Of Heart Attack : जगप्रसिद्ध बेलारशियन बॉडीबिल्डर इलिया गोलेम येफिमचिक याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तो अवघा ३६ वर्षांचा होता. शरीराच्या भारदस्त आकारामुळे बॉडीबिल्डिंग क्षेत्रात तो प्रचंड लोकप्रिय होता. यासाठी त्याला 'वर्ल्ड्स मोस्ट डेंजरस बॉडीबिल्डर'ही पदवीदेखील मिळाली होती. सोशल मीडियावरही त्याचे लाखो फॉलोवर्स होते. तो जिममधील फोटोदेखील अनेकदा शेअर करायचा. इलिया ‘गोलेम’ येफिमचिक याला '340lbs बीस्ट', ‘द म्युटंट’ म्हणूनही ओळखले जात होते.

Bigg Boss Marathi Season 5 Vishakha Subhedar Share old memories of pandharinath kamble
6 / 31

“आपला पॅडी का रडला?” याचं उत्तर देत विशाखा सुभेदारने सांगितला पंढरीनाथ कांबळेचा किस्सा

मनोरंजन Updated: September 14, 2024 18:50 IST

'बिग बॉस मराठी'मध्ये काही दिवसांपासून काही सदस्यांना उकडलेलं अन्न खाण्याची शिक्षा देण्यात आली होती. ही शिक्षा देण्यामागचं कारण 'बिग बॉस'ने स्पष्ट केलं. "आज महाराष्ट्रात एक वेळच्या अन्नासाठी देखील चूल पेटणं शक्य होतं नाही. या परिस्थितीची झलक मिळावी म्हणून आपण केवळ उकडलेलं अन्न खा," असं 'बिग बॉस'कडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर 'बिग बॉस'चे हे शब्द ऐकून पंढरीनाथ कांबळेचे अश्रू अनावर झाले. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री विशाखा सुभेदारने नुकतीच पोस्ट शेअर केली आहे.

hollywood celebrity Jennifer Aniston Salmon sperm facial
7 / 31

हॉलीवूड अभिनेत्रीचं ‘हे’ फेशियल होतंय व्हायरल! अ‍ॅंटी एजिंगसाठी फायदेशीर? तज्ज्ञांचा सल्ला

हेल्थ Updated: September 14, 2024 18:10 IST

अलीकडेच एका नवीन आणि वेगळ्या ट्रीटमेंटने सौंदर्यप्रेमी आणि सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे आणि ती ट्रीटमेंट म्हणजे- सॅल्मन स्पर्म फेशियल (salmon sperm facial). हॉलीवूड स्टार जेनिफर ॲनिस्टनने (Jennifer Aniston) या ट्रीटमेंटचा वापर केल्याचं कबूल केल्यानंतर हा ब्यूटी ट्रेंड लोकप्रिय झाला.

Tilak Verma Century at Duleep Trophy Suryakumar Yadav Shares Instagram Story said Best Birthday Gift
8 / 31

तिलकच्या शतकाचं आवेशने केलं सॅमी स्टाईल सेलिब्रेशन, सूर्या म्हणाला, “बेस्ट बर्थडे गिफ्ट”

क्रीडा Updated: September 14, 2024 17:27 IST

दुलीप ट्रॉफी 2024 च्या दुसऱ्या फेरीत भारत ए आणि भारत डी यांच्यातील सामन्यात तिलक वर्माने शतक झळकावले. पहिल्या डावात फेल ठरलेल्या तिलकने तिसऱ्या दिवशी शानदार खेळी केली. प्रथम सिंगनेही शतक झळकावले. तिलकच्या शतकावर आवेश खानने खास सेलिब्रेशन केले. सूर्यकुमार यादवने तिलकच्या शतकावर इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे कौतुक केले.

nikki tamboli mother takes arbaz patel side
9 / 31

“तुम्ही सगळे बाओ करता की…”, निक्कीच्या आईने घेतली अरबाज पटेलची बाजू

टेलीव्हिजन Updated: September 14, 2024 17:35 IST

‘बिग बॉस मराठी 5’ मध्ये निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांची चांगली मैत्री आहे. सातव्या आठवड्यात आर्या जाधवने कॅप्टन्सी टास्कमध्ये निक्कीला कानशिलात लगावली. निक्कीच्या आईने या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी संग्राम चौगुलेवरही टीका केली आहे. प्रमिला तांबोळी यांनी अरबाजच्या आक्रमकतेवर भाष्य करत निक्कीला संरक्षण मिळावे, अशी मागणी केली आहे.

Pratham Singh Scores Maiden Duleep Trophy Century for India A vs India D Match
10 / 31

शुबमन गिलच्या जागी आलेल्या ३२ वर्षीय बदली खेळाडूने झळकावले दुलीप ट्रॉफीतील पहिले शतक

क्रीडा Updated: September 14, 2024 14:47 IST

दुलीप ट्रॉफी २०२४ मध्ये भारत अ विरुद्ध भारत ड सामन्यात प्रथम सिंहने शानदार शतक झळकावले. भारत ए संघाने पहिल्या डावात २९० धावा केल्या, तर भारत डी संघाचा डाव १८३ धावांवरच आटोपला. दुसऱ्या डावात प्रथम सिंहने १२२ धावांची खेळी केली. प्रथम सिंह हा क्रिकेटपटूसह इंजिनीयर आहे आणि त्याने २०१७ मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आयपीएलमध्ये तो गुजरात लायन्स आणि KKR संघाचा भाग होता.

Nikki Tamboli Mother Reaction on Aarya Slap Incident
11 / 31

Video: आर्याने मारल्यावर निक्की तांबोळीच्या आईची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “बिग बॉसने…”

टेलीव्हिजन Updated: September 14, 2024 17:01 IST

‘बिग बॉस मराठी ५’च्या सातव्या आठवड्यात आर्या जाधव आणि निक्की तांबोळी यांच्यात भांडण झालं. कॅप्टन्सी टास्कमध्ये वाद झाल्यानंतर आर्याने निक्कीला कानशिलात लगावली. या घटनेनंतर निक्कीच्या आईने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. प्रमिला तांबोळी यांनी आर्याच्या वर्तनाची निंदा केली आणि बिग बॉसने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली. त्यांनी निक्कीला वारंवार त्रास दिला जातोय असंही म्हटलंय.

coconut peel benefits 6 benefits of health from coconut
12 / 31

नारळाची साल फेकताय? थांबा! नारळाच्या सालीपासून आरोग्याला होणारे ‘हे’ ६ फायदे एकदा पाहाच

लाइफस्टाइल Updated: September 14, 2024 15:53 IST

नारळाच्या सालीचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. अनेकदा भांडी स्वच्छ करण्यासाठी, एखादा डाग काढण्यासाठी, घरात धूप करण्यासाठी, होमहवनासाठी नारळाच्या या सालीचा वापर होतो. परंतु, आपल्या आरोग्यासाठीदेखील या सालीचे भरपूर महत्त्व आहे.

IND vs PAK Hockey India beat Pakistan by 2 1 in Asian Champions Trophy and Enters SemiFinal
13 / 31

भारतीय हॉकी संघाचा पाकिस्तानवर विजय अन् सेमीफायनलमध्ये मारली धडक

क्रीडा Updated: September 14, 2024 15:44 IST

भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत पाकिस्तानचा २-१ असा पराभव केला. कर्णधार हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नरमध्ये दोन गोल करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. भारताने सलग पाचवा विजय नोंदवला असून, गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तानने आठव्या मिनिटाला पहिला गोल केला, परंतु भारताने नंतर दोन गोल करत सामना जिंकला.

CM Mamata Banerjee at JR doctors protest place near Swasthya
14 / 31

“मला रात्रभर झोप लागली नाही”, ममता बॅनर्जींचं डॉक्टरांना शेवटचं आवाहन, म्हणाल्या…

देश-विदेश Updated: September 14, 2024 15:48 IST

कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी डॉक्टरांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आंदोलकांना आश्वासन दिले की, त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील. डॉक्टरांनी मात्र त्यांच्या पाच कलमी मागण्यांवर तडजोड न करण्याचा इशारा दिला आहे.

Health Special What happens to the body if you consume more than 30 grams of protein for breakfast?
15 / 31

नाश्त्यात ३० ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिने घेतल्यावर शरीरावर काय परिणाम होतो?

हेल्थ September 14, 2024 14:16 IST

प्रथिनांचे महत्त्व शरीरासाठी खूप आहे. प्रथिने स्नायूंची दुरुस्ती, प्रतिकारशक्ती, हार्मोन्स संतुलन आणि वजन नियंत्रणात मदत करतात. श्री बालाजी मेडिकल कॉलेजच्या आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी श्रीराम यांच्या मते, नाश्त्यात ३० ग्रॅम प्रथिने घेणे सुरक्षित आहे, परंतु जास्त प्रथिने घेतल्यास अपचन आणि निर्जलीकरण होऊ शकते. किडनीच्या आजार असलेल्या व्यक्तींनी उच्च प्रथिनेयुक्त आहार टाळावा. नाश्त्यासाठी १५-३० ग्रॅम प्रथिने योग्य आहेत.

Matthew Short 5 Wickets Haul Becomes the First opening batsman from the Full Member nation to take 5 wickets in T20I
16 / 31

ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीराने चेंडूसह घडवला इतिहास, T20Iमध्ये ही कामगिरी करणारा पहिला खेळाडू

क्रीडा Updated: September 14, 2024 13:31 IST

इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने ३ विकेट्सने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू शॉर्टने २२ धावांत ५ विकेट घेत ऐतिहासिक कामगिरी केली. शॉर्टने इंग्लंडच्या ५ प्रमुख फलंदाजांना बाद केले आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ५ विकेट घेणारा पहिला ऑस्ट्रेलियन सलामीवीर ठरला. लियाम लिव्हिंगस्टोनच्या ८७ धावांच्या खेळीमुळे इंग्लंडने १९४ धावांचे लक्ष्य गाठले.

Cyber scam mumbai women nude pictures
17 / 31

व्हिडीओ कॉलवर महिलेला विवस्त्र होण्यास सांगितले; मग पैसे उकळले, अशी होते सायबर फसवणूक

मुंबई Updated: September 14, 2024 17:10 IST

सायबर घोटाळ्यांबाबत रोज नवनवीन बातम्या येत असतानाही लोक सायबर फसवणुकीला बळी पडत आहेत. मुंबईतील ३६ वर्षीय महिला वकिलाला एका कॉलद्वारे फसवले गेले. तिला पवई येथील हॉटेलमध्ये बोलावून नग्न फोटो आणि व्हिडीओ मिळवले. तिच्या खात्यातून ५० हजार रुपये चोरट्यांनी वळवले. पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Bigg Boss Marathi Season 5 Riteish Deshmukh fire on Sangram Chaugule
18 / 31

Video: “मिस्टर इंडिया”, म्हणत रितेश देशमुखने संग्राम चौगुलेची केली कानउघडणी, म्हणाला…

मनोरंजन Updated: September 14, 2024 17:59 IST

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा सातवा आठवडा देखील दणक्यात पूर्ण झाला आहे. पण आठवड्याच्या शेवटी घरात निंदनीय घटना घडली. ज्याबद्दल सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान आर्या व निक्कीमध्ये धक्काबुकी झाली. याच वेळी आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. यामुळे आर्याला तात्पुर्ती जेलची शिक्षा देण्यात असली तरी आज 'भाऊच्या धक्क्या'वर आर्याला कठोर शिक्षा सुनावली जाणार आहे. अशातच रितेश देशमुखने वाइल्ड कार्ड स्पर्धक संग्राम चौगुलेची चांगलीच कानउघडणी केल्याचं समोर आलं आहे.

shukra gochar 2024 after 4 days Venus enter in Libra
19 / 31

नुसता पैसा; शुक्र करणार तूळ राशीत प्रवेश ‘या’ राशीच्या व्यक्तींवर देवी लक्ष्मीची कृपा

राशी वृत्त September 14, 2024 11:53 IST

शुक्र ग्रह १८ सप्टेंबर रोजी तूळ राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे काही राशींना सकारात्मक परिणाम दिसतील. मेष राशीला आर्थिक लाभ, करिअरमध्ये यश आणि आरोग्य सुधारणा होईल. वृषभ राशीला आर्थिक स्थिती सुधारेल, कुटुंबात आनंद आणि वैवाहिक जीवन सुखमय होईल. कर्क राशीला आत्मविश्वास वाढ, शिक्षणातील अडथळे दूर, आणि करिअरमध्ये चांगले बदल दिसतील.

Virat Kohli Selfie with Radhika Sharathkumar Tamil Actress who is Mother in Law of Indian Cricketer
20 / 31

भारतीय क्रिकेटपटूच्या अभिनेत्री सासूबाईंचा विराटबरोबर सेल्फी, पोस्ट शेअर करत म्हणाल्या…

क्रीडा September 14, 2024 10:46 IST

भारतीय संघ सध्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी चेन्नईत आहे. विराट कोहली लंडनहून परतला असून, त्याचा तमिळ अभिनेत्री राधिका सरथकुमार यांच्याबरोबरता सेल्फी व्हायरल झाला आहे. राधिका यांनी हा फोटो शेअर करत विराटचं कौतुक केलं. राधिका सरथकुमार तमिळ चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री असून, त्यांचा जावई भारतीय क्रिकेटपटू आहे. पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरला चेन्नईत होणार आहे.

A success story of a milk man from Bihar who sold milk at the age of 10 and bought land, three vehicles, various homes, and a property worth crores
21 / 31

वयाच्या १० व्या वर्षी विकलं दूध; पण आज बक्कळ पैसा, तीर्थानंद सिंग यांची प्रेरणादायी गोष्ट

करिअर September 14, 2024 10:18 IST

भारतातील अनेक तरुण आणि मध्यमवयीन लोक नोकरी करून आपला उदरनिर्वाह भागवतात. दरम्यान, या सगळ्या धकाधकीच्या जीवनात काही लोक असे आहेत, ज्यांच्याकडे व्यवसाय करण्याची क्षमता असते आणि त्या क्षमतांचा वापर करून ते लाखो रुपये कमवण्यात यशस्वी होतात. बिहारमधील दूध विक्रेता तीर्थानंद सिंग यांची प्रेरणादायी गोष्टदेखील काही अशीच आहे. तीर्थानंद सिंग यांनी वयाच्या १० व्या वर्षी दूध विकायला सुरुवात केली आणि आजही वयाच्या ७० पेक्षा जास्त वयात ते दूध विकत आहेत. 

abhijeet kelkar post on aarya slapped nikki tamboli
22 / 31

निक्कीला मारणाऱ्या आर्याला ‘बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वातील सदस्याने दिला सल्ला, म्हणाला…

टेलीव्हिजन Updated: September 14, 2024 09:30 IST

'बिग बॉस मराठी 5'च्या सातव्या आठवड्यात 'जादुई हिरा' कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्या आणि निक्कीमध्ये वाद झाला. झटापटीत आर्याने निक्कीला कानशिलात लगावली. अभिजीत केळकरने संयम आणि मानसिक संतुलनाचे महत्त्व सांगत आर्याला माफी मागण्याचा सल्ला दिला. बिग बॉसने आर्याला जेलमध्ये टाकले असून, अंतिम निर्णय रितेश देशमुख घेणार आहे.

Leeza Bindra slams nikki tamboli bigg boss marathi 5
23 / 31

“रितेश सरांनी त्या मुलीला…”, अरबाज पटेलची गर्लफ्रेंड निक्कीबद्दल स्पष्टच बोलली

टेलीव्हिजन Updated: September 14, 2024 15:17 IST

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात अरबाज पटेल व निक्की तांबोळी यांची जवळीक चर्चेत आहे. अरबाजने घरात त्याची गर्लफ्रेंड लिझा बिंद्रा असल्याचं सांगितलं. लिझाने इन्स्टाग्रामवर अरबाजबरोबरचे रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्याच्यावर प्रेम असल्याची कबुली दिली आहे. तसेच निक्कीला अरबाज कमिटेड असल्याचं रितेश सरांनी दोनवेळा सांगितलंय, असंही लीझा म्हणाली.

Vicky Kaushal Comment On elderly woman tauba tauba dance video
24 / 31

‘तौबा-तौबा’ गाण्यावरील आजीबाईंच्या ग्रुपचा डान्स व्हिडीओ पाहून विकी कौशल भारावला, म्हणाला…

मनोरंजन Updated: September 13, 2024 18:44 IST

काही महिन्यांपूर्वी विकी कौशलचा 'बॅड न्यूज' चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यातील 'तौबा-तौबा' गाणं खूप गाजलं. या गाण्यावर आजीबाईंच्या ग्रुपने केलेला डान्स केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होता. या आजीबाईंच्या ग्रुप डान्स व्हिडीओवर आता विकी कौशलने प्रतिक्रिया दिली आहे.

Shubhagi Gokhale reaction on sakhi and suvrat joshi drama varvarche vadhuvar
25 / 31

“सखीकडे बघून सारखं भरून येत होतं”, लेक आणि जावयाच्या नाटकावर शुभांगी गोखलेंची प्रतिक्रिया

मनोरंजन Updated: September 13, 2024 20:27 IST

विराजस कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित 'वरवरचे वधू-वर' हे नाटक सध्या रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. सखी गोखले, सुव्रत जोशी आणि सूरज पारसनीस प्रमुख भूमिकेत आहेत. नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, शुभांगी गोखलेंनी नाटकाचे कौतुक केले आहे. सखी, सुव्रत आणि विराजसच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे.

Madhuri Dixit govinda
26 / 31

बॉलीवूड अभिनेता पत्नीला म्हणतो, “…तर मी माधुरी दीक्षितशी लग्न केलं असतं”

बॉलीवूड Updated: September 13, 2024 19:39 IST

बॉलीवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितचे चाहते जगभरात आहेत. अभिनेता गोविंदाने माधुरीचे कौतुक करत तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने सांगितले की, पत्नी सुनीताने नकार दिला असता तर त्याने माधुरीशी लग्न केलं असतं. गोविंदाने माधुरीच्या अभिनयाचे, स्वभावाचे आणि मैत्री निभावण्याच्या गुणांचे कौतुक केले.

rbi governor shaktikant das on repo rate
27 / 31

व्याजदरांबाबत RBI गव्हर्नर दास यांचं मोठं विधान; म्हणाले, “महागाई आटोक्यात येतेय, पण…”

देश-विदेश September 13, 2024 16:48 IST

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी फ्युचर ऑफ फायनान्स फोरम २०२४ मध्ये महागाई आणि व्याजदर धोरणाबाबत महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांनी महागाईचा दर ४% च्या आत आणण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले. गेल्या १८ महिन्यांपासून व्याजदर जैसे थे ठेवले असून, यंदाही त्यात बदल होण्याची शक्यता नसल्याचे सूतोवाच त्यांनी दिले आहेत. आरबीआयने २०२४-२५ साठी विकासदराचा अंदाज ७.२% वर्तवला आहे.

TATA Electric Car Discounts on Nexon EV, Punch EV, and Tiago EV models in Marathi
28 / 31

सणासुदीला कार खरेदी करताय? Tata Motors देणार ‘या’ इलेक्ट्रिक कार्सवर ३ लाखांचं डिस्काउंट

ऑटो September 13, 2024 17:10 IST

सध्या देशभरात गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्री, दसरा, दिवाळी असे एकामागोमाग एक सण सुरू होतील. या सणासुदीच्या हंगामात अनेक जण नवीन कार घेण्याचा विचार करतात. जर तुम्हीही नवी कोरी कार घेणार असाल तर थांबा! टाटा मोटर्स त्यांच्या काही लोकप्रिय इलेक्ट्रिक कार मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणावर सूट देणार आहे आणि या डिस्काउंटमुळे तुमची जवळजवळ तीन लाखांपर्यंत बचत होऊ शकते.

pankaja munde rahul gandhi
29 / 31

“राहुल गांधींबाबत मनोज जरांगे पाटील…”, पंकजा मुंडेंचं टीकास्र; ‘या’ विधानावरून…

महाराष्ट्र Updated: September 13, 2024 16:13 IST

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील विधानावर टीका केली आहे. राहुल गांधींच्या विधानामुळे अनुसूचित जाती-जमातींमध्ये प्रक्षोभ निर्माण झाला असून, त्यांनी माफी मागावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली. तसेच, मनोज जरांगे पाटील यांच्यावरही त्यांनी टीका केली. राहुल गांधींनी भारतातील आरक्षणाविषयी केलेलं विधान चर्चेत आलं आहे.

Bajaj Triumph New Speed 400
30 / 31

Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी येतेय ‘ही’ नवीन बाईक, जबरदस्त लूक, ३३४ सीसी इंजिन अन्…

ऑटो Updated: September 13, 2024 15:58 IST

 दुचाकी निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डच्या बाईक्सची तरुणांमध्ये एक वेगळी क्रेझ पाहायला मिळते. परंतु, आता रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी ब्रिटीश बाईक निर्माता ट्रायम्फ आपली नवीन बाईक लाँच करत आहे. या नवीन बाईकमध्ये 400 cc पर्यंत हेवी पॉवर इंजिन दिले जाईल असा अंदाज आहे. सध्या ही बाईक बाजारात आधीपासून असलेल्या स्पीड 400 चे नवीन अपडेटेड व्हर्जन असेल की नवीन बाईक असेल याची माहिती कंपनीने शेअर केलेली नाही.

gopaldas agrawal joins congress
31 / 31

“मोठ्या अपेक्षेनं भाजपात गेलो होतो, पण…”, माजी आमदारांची काँग्रेसमध्ये घरवापसी!

महाराष्ट्र Updated: September 13, 2024 15:38 IST

गोंदिया जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अगरवाल यांनी भाजपातून बाहेर पडून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी भाजपावर टीका करताना सांगितले की, भाजपामध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आणि सहकार्याची भावना कमी होती. त्यांनी काँग्रेसला गोंदियातून निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सांगितले.