रो शोमध्ये विजय यांनी लेकाच्या चित्रपटाचं केलं प्रमोशन
तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय मधुरंधगम येथे रोड शो करत असताना एका कार्यकर्त्याने त्यांना मुलगा जेसन संजयचा फोटो फ्रेम करून दिला. जेसनचा पहिला चित्रपट 'सिग्मा' २ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. विजय यांनी ती फ्रेम उचलून समर्थकांना दाखवली. विजय प्रचारात व्यस्त असताना, जेसनचे कुटुंब चेन्नईत चित्रपटाच्या फर्स्ट-डे-फर्स्ट-शोला उपस्थित होते. 'सिग्मा'ने पहिल्या दिवशी २.३५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले.