“गैरों के बिस्तर पे…”, चहलबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर धनश्री वर्माच्या गाण्याने वेधलं लक्ष
अभिनेत्री व नृत्यदिग्दर्शिका धनश्री वर्मा आणि भारतीय क्रिकेट संघातला स्टार स्पिनर युजवेंद्र चहल यांचा घटस्फोट झाला आहे. गुरुवारी २० मार्चला मुंबईतील वांद्रे फॅमिली कोर्टात दोघांच्या घटस्फोटाची सुनावणी झाली. या कोर्टाबाहेरील दोघांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आले आहेत. चहल मास्क घालून कोर्टाच्या आवारात पाहायला मिळाला. तर धनश्री गॉगल लावून कोर्टात पोहोचली होते. दोघेही घाईघाईने कोर्टात जाताना दिसले होते. घटस्फोटानंतर धनश्री वर्माचं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे.