प्रसिद्ध अभिनेत्री घरातील बाथटबमध्ये आढळली मृतावस्थेत
जपानमधील प्रसिद्ध अभिनेत्री व गायिका मिहो नाकायामा हिचा ५४ व्या वर्षी मृत्यू झाला आहे. ती टोक्यो येथील घरात बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळली. ६ डिसेंबर २०२४ रोजी ओसाका येथे ख्रिसमस कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करणार होती, परंतु प्रकृतीच्या कारणास्तव कॉन्सर्ट रद्द केला होता. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मिहो १९८० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होती आणि 'लव्ह लेटर' चित्रपटातील भूमिकेसाठी प्रसिद्ध होती.