रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार डॅनी पंडितने (खरे नाव मुकेश पंडित) लग्न केले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर पत्नी नेहा कुलकर्णीसोबतचे फोटो शेअर केले. त्यांच्या लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. नेहा व्हीएफएक्स आर्टिस्ट आहे. डॅनीचे लाखो फॉलोअर्स असून, तो विविध पात्रांमुळे लोकप्रिय आहे. वकील असलेल्या डॅनीने बी. कॉम, एलएलबी आणि कंपनी सेक्रेटरीचे शिक्षण घेतले आहे.