‘फुले’ चित्रपटावरून अनुराग कश्यपचे ब्राह्मण समाजाबद्दल वादग्रस्त विधान; गुन्हा दाखल
प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने 'फुले' चित्रपटाच्या प्रदर्शनावरून सुरू असलेल्या वादात उडी घेतली. चित्रपटाचे प्रदर्शन रोखल्याबद्दल संताप व्यक्त करताना, कश्यपने ब्राह्मण समाजाबद्दल वादग्रस्त विधान केले. या विधानामुळे त्याच्यावर टीका होत असून त्याला धमक्याही मिळाल्या. आता अनुराग कश्यपने दिलगिरी व्यक्त केली, परंतु त्याच्या विधानावर ठाम असल्याचे म्हटले आहे. याबद्दल मुंबईत त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.